Wednesday, 24 July 2013
माश्याच्या उदरामध्ये कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट झाले. शंकराच्या तृतीय नेत्रापासून जो अग्नी निर्माण झाला त्याच्या जठरी अंतरिक्ष नारायणाने ज्न्म घेऊन जालिंदरनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. ब्रम्हदेवाच्या विर्याचा अंश रेवा तीरी पडला त्यामधून चमसनारायणाने, रेवणसिद्ध या नावाने जन्म घेतला. सर्पिणीच्या उदरात अविर्होत्र नारायणाने प्रवेश करुन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट झाले. मच्छिंद्रनाथाने मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडले व त्यातून गोरक्षनाथांचा जन्म झाला. पायी रगडलेल्या वीर्यातून कुशबिटामध्ये पिप्पलायन नारायण यांनी चरपटीनाथ या नावाने जन्म घेतला. भर्तरी या नावाच्या कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात धृवमीन नारायणाने संचार करुन भतृहरी- भार्तरीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. हत्तीच्या कानात पडलेल्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने प्रवेश करुन कानिफनाथ या नावे जन्म घेतला. गोरक्षनाथाने मातीचा पुतळा तयार केला व त्याच बरोबर त्याचा संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता. त्या पुतळ्यामध्ये करभाजन नारायणाने प्रवेश केला व गहिनीनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. याप्रमाणे नवनारायणांनी नवनाथ रुपाने जन्म घेतला व नाथ संप्रदायाची सुरुवात झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment