Friday, 23 August 2013

 बालाजी यात्रे निमित्त देवराई येथे अखंड हरिनाम सप्ताह व भगवान बाबाची कथा चे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये श्री . नंद किशोरजी महाराज उप स्थित जनसमुद याला बाबाची माहिती देताना ….  

Thursday, 22 August 2013

Friday, 16 August 2013

Thursday, 15 August 2013

बालाजी यात्रोत्सव २०१३ देवराई
२८ ऑगस्ट २०१३ :- संध्याकाळी ६ ते १० कावडी मिरवणूक
२८ ऑगस्ट २०१३ :- रात्री १० ते १२ जन्माष्टमी ची पोथी वाचन व इतर धार्मिक कार्यक्रम
२८ ऑगस्ट २०१३ :- रात्री १२ वाजता श्रीकृष्णा जन्म सोहळा .
२८ ऑगस्ट २०१३ :- रात्री १२. ३० नंतर अभिषेक व इतर  कार्यक्रम
२९ ऑगस्ट २०१३ :- सप्ताह सांगता कीर्तन व गोपाळकाला दहीहंडी कार्यक्रम
२९ ऑगस्ट २०१३ :- प्रसाद वाटप

तरी सर्व भक्तांनी श्री क्षेत्र बालाजी देवस्थान देवराई ता . पाथर्डी  येथे उपस्थित राहावे . 

Monday, 12 August 2013



श्री क्षेत्र वृध्देश्वर: गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरस  नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे.
येथील मंदिराचे रंगरंगोटी चे काम पूर्ण झाले आहे . याच महिन्यात श्री क्षेत्र वृध्देश्वरची यात्रा असल्यामुळे भाविकाचे तसेच पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी हिरवाईने नटलेला डोगंर व निसर्ग परिचर केंद्र सज्ज झाले आहे. तर चला मग  वृध्देश्वरला ……… 





Wednesday, 31 July 2013

                              भाविकांचे श्रद्धास्थान देवराई येथील                व्यंकटेश बालाजी देवस्थान 

पाथर्डी तालुक्यातील  देवराई येथील ग्रामदैवत असलेल्या व्यंकटेश बालाजी  हे जिल्ह्यातील नाथ परंपरेतील प्राचीन व धार्मिक वारसा लाभलेलं एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळखले जाते .या देवस्थानला पूर्वी ग्वाल्हेरच्या तत्कालीन राजाकडून सनद पुरवली जात होती
सुमारे २००० वर्षाचे हे प्रचींन मंदिर हेमाडपंथी स्वरुपात उभे होते. आता मात्र येथे मंदिराची नव्याने उभारणी करण्यात आली आहे. याच मंदिराजवळ ऎतिहसिक बारव आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी यात्रा भरते . या  वेळी राज्यभरातून मोठ्या  संख्येने भाविक येथे येतात .तसेच गोकुळाष्टमी निमीत्त येथे धार्मिक कार्यकामचे आयोजन केले जाते . देवराई गावाबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. गावापासून जवळच असलेल्या प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे मच्छिंद्रनाथाल व गोरक्षनाथ यांनी सोमयाग यज्ञ घातला. यावेळी सर्व देव देवतांना आमंत्रित करून महाप्रसादाचे आयोजन केले .त्यावेळी उपस्थित देव देवतांनी भोजनासाठी जेथ पयंत रांगा लावल्या ते ठिकाण म्हणजे देवराई अशी या गावाची ओळख आहे. यज्ञ सांगतेनंतर उपस्थित देव देवतांना सन्मानित करून धन धान्य सुवर्णमुद्रा व अलंकार देऊन स्वगृही पाठविण्यात आले. 
    उर्वरित संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी  भगवान विष्णू अर्थात व्यंकटेश बालाजीवर टाकून भगवान आदिनाथ वृद्ध रुपात येथेच थांबले तेच हे प्रसिद्ध ठिकाण  श्री क्षेत्र वृध्देश्वर म्हणून ओळखले जाते. म्हणून  धन धान्य पैसा  आदीचे रक्षण व्यंकटेश बालाजी करतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री क्षेत्र वृध्देश्वरला व मढी ला दूरवरून दर्शनासाठी येणारा भाविक प्रथम देवराई येथे व्यंकटेश बालाजी चे दर्शन घेऊन पुढे जातो. 

मंदिराचा जीर्णोद्धर :-
सन २००९-२०१० या कालावधीत  मंदिराचे नवीन बांधकाम करण्यात आले असून खासदार दिलीप गांधी याच्या निधीतून सभामंडप तर ग्रामस्थ व भाविकांच्या सहकार्याने मंदिरचे काम चालू आहे . दोन वर्षापूर्वी राजस्थान येथून आणलेली काळ्या स्फटिकाची आकर्षक बालाजीची मूर्ती विधिवत बसविण्यात आली आहे मंदिराचे शिखर व गाभारा व सभामंडप अशी आकर्षक स्वरुपाची कामे करण्यात आली आहे. 

 इतर पूर्ण झालेली कामे    :-

  1. संकटमोचन हनुमान मंदिर :- हनुमानच्या मूर्तीची स्थापना रामदास स्वामीनी केलेली आहे. ही मूर्ती दक्षिण मुखी असून तेलाची आहे. २००८ मध्ये या मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. 
  2. रेणुका माता मंदिर :- रेणुका माता देवीचा आकर्षक  अशा तांदळा आहे. तसेच शिखराचे सुंदर असे काम नांदेड येथील कारागिराने पूर्ण केले असून मंदिराचे आतील संपूर्ण काम देवराई येथील भक्ताने पूर्ण केले आहे. 
  3. जि. प. सदस्य अर्जुनराव शिरसाठ  यांच्या निधीतून पथदिव्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
  4. देवराई ग्रामपंचायतने मंदिर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रेटचे काम पूर्ण केले.              
             यात्रा उत्सवतील  विविध कार्यक्रम
  येथील बालाजीची यात्रा ऑगस्ट महिन्यात असते. बालाजीला पैठण वरून आणलेल्या कावडीच्या पाण्याने रात्री १२ वाजता म्हणजे  गोकुळाष्टमी  च्या दिवशी  जलाभिषेक घातला जातो. याच दिवशी भाविकांनी आणलेल्या कवडीची मिरवणूक काढली जाते यावेळी फटक्याची आतिषबाजी केली जाते. जन्माष्टमीच्या दिवशी कृष्ण जन्माची पोथी वाचली जाते . तसेच बालाजी सार्वजनिक ट्रस्ट कडून विद्ययुत रोषणाई केली जाते .
   





श्री क्षेत्र वृध्देश्वर: गर्भगिरीच्या पर्वतावर घाटशिरुर नजीक एका दरीमध्ये श्री आदिनाथ हे वृध्देश्वराच्या रुपाने वास्तव्य करीत आहे.. नवनाथांचे आद्यपिठ श्री आदिनाथ वृद्धेश्वर मंदिर हे श्री क्षेत्र मढी येथून १६ कि.मी. अंतरावर असून या ठिकाणी महादेव शंकराची स्वयंभू पिंड आहे.या ठिकाणी कावडीचे गंगास्नान होते या ठिकाणी झालेल्या देवी देवतांच्या महायज्ञात ठरल्याप्रमाणे नाथांनी संजीवन समाध्या घेतल्या आहेत व या ठिकाणी बाराही महिने शिवलिंगातून पाणी पाझरते. या ठिकाणी अनेक औषधी वनस्पती आढळुन आल्यामुळे शासनाने या ठिकाणाला निसर्ग परिचय केंद्र घोषीत केले आहे.

श्री क्षेत्र वृध्देश्वर मंदीर हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृध्देश्वर या गावी आहे . नगरहुन सुमारे ४० ते ४५ कि.मी. अंतरावर आहे. येथे जागृत शिव मंदीर आहे. 
येथील शिवलींग स्वयंभु शिवलींग आहे, ते दरवर्षी महाशिवरात्रीला गव्हाच्या आकाराएवढे वाढते म्हणजेच वृध्दींगत होते म्हणुन “वृध्देश्वर” नावाने ओळखले जाते . “आदिनाथ गुरु सकळ सिध्दांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य.” वृध्देश्वर हे नाथ सांप्रदायाचे आद्यपिठ म्हणुन ओळख आहे. आणि तसेच नवनाथ ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक २३ मध्ये याच ठिकाणी शंकर भगवान व पार्वती म्हातारयाचे रुप घेऊन पंगतीला वाढण्याचे काम केले म्हणुन त्यांना “म्हातारदेव” नावाने देखील ओळखले जाते व शंकर भगवान यांनी मी येथेच स्वयंभु परिपुर्ण राहील असे सांगीतले.
या शिवलिंगामधुन कायम गंगा वहाते.. येथे नाथांनी यज्ञ केलेला आहे. या यज्ञासाठी ३३ कोटी देव आले होते आणि हाच गर्भगिरी डोंगर गोरक्षनाथांनी सोन्याचा डोंगर केलेला आहे. 
स्त्री राज्यातुन मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथांनी आणले, त्यावेळेस मैनावती राणीने दिलेली सोन्याची वीट असलेली झोळी मच्छिंद्रनाथाने लघवीचे निमित्त करुन गोरक्षनाथाकडे दिली त्यात ती सोन्याची वीट होती. गोरक्षनाथाने ती विट फेकुन दिली व त्यामध्ये त्याच आकाराचा दगड ठेवला. गर्भागिरीच्या डोंगरावर आल्यावर मच्छिंद्रनाथांनी झोळी मध्ये पाहिले तर दगड होता. त्यामुळे दोघांमध्ये भांडण सुरु झाले व गोरक्षनाथांनी गर्भागिरी डोंगर सोन्याच्या करुन दाखवला. 
येथे महाशिवरात्र, श्रावणी तिसरा सोमवार या दिवशी पैठण वरुन पायी कावडीने पाणी आणले जाते. या ठिकाणी दिवसेंदिवस गर्दी वाढत असुन लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात.
वृध्देश्वर या ठिकाणी आर्युवेदीक वनस्पती भरपुर प्रमाणात आढळतात येथे वनाविभागाने पर्यटन केंद्रही चालु केले आहे. मंदिरासभोवती मोर, वानर इ. प्राणि खुल्या वातावरणात पहावयास मिळतात. त्याचा भाविक आनंद लुटतात. श्रावण मासा निमित्ताने महिनाभर बेलआरती सायंकाळी ८ ते ९ या वेळेत होते. बेल आरतीची सांगता व देवाला शित लावणे हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो आणी महाप्रसादाचा हजारो भाविक लाभ घेतात. येथे धार्मिक साप्ताहिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. हा परिसर फुलवेलींनी नटलेला आहे.
देवस्थान समितीने सुंदर कोरीवकाम असलेले राजस्थानी पध्द्तीचे प्रवेशव्दाराचे व ओवऱ्याचे काम हाती घेतले आहे. श्री वृध्देश्वर देवस्थान घाटशिरस ट्रस्ट अध्यक्ष सुधाकर शिवराम पालवे यांच्या अध्यक्षतेखाली  मंदिराचे व्यवस्थापन व इतर कामे सुनियोजित गतीने चालु आहेत.